दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाईम्हशी कोणाच्या, लक्शुमणाच्या
गाईम्हशी कोणाच्या, लक्शुमणाच्या
(होय हेच्च बरोबर
आहे कारण आम्ही हेच मोठ्यामोठ्यानी ओरडत फिरायचो की गावभर)
अशी गाणी गात लहान मुले गल्लीत नाचायला लागली की दिवाळी जवळ आल्याची चाहुल लागायची. आता मात्र रोजच दिवाळी असल्याने याची गम्मत तितकीशी राहिली नाही.. यात मला पुर्वीचे आणी आत्ताचे असा फरक करायचा नाहीये पण........(हा 'पण' मोठा वाईट गड्या.... हाच सगळ्याची 'जड' आहे.......)
अशी गाणी गात लहान मुले गल्लीत नाचायला लागली की दिवाळी जवळ आल्याची चाहुल लागायची. आता मात्र रोजच दिवाळी असल्याने याची गम्मत तितकीशी राहिली नाही.. यात मला पुर्वीचे आणी आत्ताचे असा फरक करायचा नाहीये पण........(हा 'पण' मोठा वाईट गड्या.... हाच सगळ्याची 'जड' आहे.......)
आमच्या वेळेला अस्सं आणी तुमच्या वेळेला तस्सं असे बोलुन मला तुम्हाला बोर करायचे नाही. पण ती मजा आज नाही हे सगळेच म्हणतात. कदाचित आत्ताची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला ही दिवाळी रंगवुन सांगतीलही. पण मला आठवते ती लहानपणीची दिवाळी.... खाउन पिउन सुखी असणार्या मध्यमवर्गीयांचे प्रमाण जास्त असण्याचा काळ तो......परिक्षा सुरु व्हायच्या आधीच या दिवाळीचे वेध लागायचे........बांबू आणायचा तो रात्रभर भिजत घालायचा दुसर्या दिवशी त्याच्या कामट्या करायच्या त्या चांदणीच्या आकारात बांधायच्या.... त्यावर घरी केलेल्या खळीने रंगीत कागद चिकटवायचा......खाली झिरमिळ्या जोडायच्या आणी चढवायचा आगलदिवा उंचचउंच .........दारात किल्ला बनवायचा. त्याला पायर्या करायच्या. हाळीव पेरायचे. छान गवत उगवले त्यावर की खर्याखुर्या किल्ल्याचा भास व्हायचा. मग मावळे विराजमान व्हायचे ........समोरच्या तळ्यात आणी झुडपात प्राणीही यायचे खेळण्यातले....... उत्साही दादालोक सलाईनच्या बाटलीपासुन कारंजंही बनवायचे.
हे सगळं सांघीक
असायचे बरं का ! आता आपल्या बंद दारामागे जगाच्या खिडकीत स्टेटस अपडेट करणारी
प्रजा........शेजारच्या काकूंच्या मदतीला आई जायची अन ताईही. असे सगळे मिळून
मिसळुन असायचे........कसे जपायचे ते स्पेस वगैरे
ना! एकत्र कुटुंब, येणारे पाहुणे यासाठी आजसारखा एक किलो विकतचा चिवडा कसा पुरेल? तो व्हायचा चांगला डबाभर.तीच गत करंजी लाडु अन चकलीचीही....... आत्तासारखे खुप
पदार्थ अन मिठाईची रेलचेल नसेल् तेंव्हा.....कदाचीत
आताप्रमाणे 12 महिने सगळे मिळत नसल्याने , मोजकेच घरी बनणारे पदार्थ कधी खायला मिळतात यावर
सगळ्यांचे लक्ष असायचे......
नवे कपडे, दागिने, वस्तु असे सगळे सणावाराला घ्यायची प्रथा असल्याने अप्रुप असायचे सगळ्याचे. दाराशी पणत्यांच्या राशी
ठेवणार्या ताई, आई, माम्या, मावश्या, काकवांचे चेहरे कामानी दमलेले दिसले तरी
घरच्यांच्या कौतुकांच्या नजरा कृतकृत्य करायच्या त्यांना. दाराशी रेखाटलेली सुरेख रांगोळी पायात कचकच वाटत नव्हती ........
पैसा कमी होता, जागाही लहान.
त्यात प्रायव्हसी तरी कितीशी असणार. पण बाबांच्या डोळ्यातुन ओसंडुन वाहणारे आईबद्द्लचे अव्यक्त प्रेम तीच्या पर्यंत पोहोचायचेच.......आणि आता शुल्लक गोष्टींमुळे
काडीमोड घेणारे पाहिले की किव येते. घेण्याबरोबरच
देण्यातले सुख, अबोल प्रेम कसे कळणार यांना.........महागाई तेंव्हाही
जाणवायचीच की, पण आत्तासारखं सगळं असून आतुन कायम तुटल्यासारखे नाही वाटायचे
तेंव्हा..........फटाक्याची लड लावण्याऐवजी त्या मोकळ्या करुन एक एक वाजवण्यात मजा होती......... शेजारच्या
मुलाकडे असणारे झाड किंवा भुईचक्र बघतानाही तेवढाच आनंद
व्हायचा...... आपल्याकडे ते का नाही किंवा ते मी का नाही लावले याबद्दल
असुया आजच्यासारखी नव्हती.
तेंव्हा
शेजारच्यांची वस्तु हक्कांने मागीतली जायची अन त्यांची ताई तिच्या दाखवण्याच्या कार्यक्रमात आपल्या आईची
साडी नेसायची..... माझे मला मी हे जरा कमी होते बहुदा तेंव्हा......... काका बॅंडवाल्यासारखा
सगळ्यांना एकाच प्रकारचे फ्रॉक घ्यायचा ते ही छानच
वाटायचे. आजसारखे कधीही मॉलमध्ये जाउन खरेदी करायची पध्द्त नव्हती तेंव्हा. आणि एकत्र कुटुंबांमुळे सगळ्यांचा आपसुकच विचार व्हायचा.....
ते चांगले. हे वाईट.
असे नाही म्हणायचे मला. ही कालगती आहे. त्याबरोबर चालावे तर लागणारच. आजचे सगळेच वाईट आहे असेही नाही. पण
एखादी गोष्ट मिळण्यासाठीचा संयम संपतोय का आपला...आज
आत्ता ताबडतोब हे किती योग्य?
पुर्वी कोकणात दोन
आकाशकंदिल बनवायचे म्हणे...... पायाखाली किरट फोडायचे नरकासुराचा वध म्हणुन..... अभ्यंगस्नानाला खसखशीचे बदामाचे वाटण उटणे म्हणुन लावायचे..वासाचे तेल आणी साबण वर्षाकाठीच यायचा ना घरात....... म्हणुन कोण कौतुक........अंगाला तेल लाउन
उनउन पाण्याची पहाटेची आंघोळ ......... मग फराळावर आडवा
हात .........काय मजा होती ओ.. आत्ताही यातले बरेचसे घडतेच. प्रत्येकाला त्याची पहीली दिवाळी अन दिवाळसण
महत्वाचा असतोच.
पण काकुला रगडुन
तेल लावायला सांगणारा काका, आपल्या गृहलक्ष्मीला, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घसघशीत ओवाळणी घालायचा. ते बघुन घरातल्या
लक्ष्मीला मान द्यायला पुढची पिढी आपसुकच
शिकायची..... भावाच्या तावडीतुन या दिवसात सुटका नसली
तरी सगळ्या दादुटल्यांकडुन मिळणारी ओवाळणी हा तर आनंदाचा ठेवाच असायचा. आता सख्खा भाउ परदेशी असल्याने व्हर्च्युअल ओवाळण्याच्या दिवसात इतर
भावांची तर बातच नको.
काहीतरी मुठीतून
सुटणार्या वाळूसारखे हुरहुर लावणारे आहे..... हेच खरे! (पण हेच वास्तव आहे म्हाराज..........! चला मॉल मध्ये
चक्कर मारावीच लागणार फारच एकटे वाटतेय ओ......)
- भाग्यश्री कुलकर्णी
No comments:
Post a Comment