Showing posts with label article on sathidar. Show all posts
Showing posts with label article on sathidar. Show all posts

Tuesday, January 21, 2014

साप्ताहिक साथीदार युवक दिन विशेषांक



साप्ताहिक साथीदार युवक दिन विशेषांक
साथीदार कडून स्वामी विवेकानंदाच्या १५१ व्या जयंतीस आणि युवक दिनानिमित्त मेलद्वारे युवकांच्या अपेक्षा आणि उपेक्षा यांवर मत मागविले गेले. त्यातील काही निवडक मते खास आपल्या वाचकांसाठी- 

विराम गांगुर्डे, नाशिक - 

ग्रामीण भागातील युवांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. त्याने या देशाची प्रगती होईल. संस्कृती न विसरता तिचे जतन आणि संवर्धन करावे. आपण कोण आहोत आणि काय करत आहोत याचेही भान युवापिढीने ठेवायला पाहिजे.

चित्रा राजगुरू, नाशिक - 

युवा हा वयवाचक शब्द नसून तो वृत्तीवाचक शब्द आहे. सगळ्याच पारंपारिक गोष्टी व पद्धती कुलाच्या आहे असे नाही, पण प्रगतीत बाधा आणणाऱ्या व नवीन कल्पनांना नाकारणाऱ्या विचारांना मोडून नवनवीन कल्पनांचा पुरस्कार करणारा प्रत्येक विचार व त्याला स्वीकारणारा प्रत्येक व्यक्ती युवा आहे.

अमृता घोलप, नाशिक

आजच्या युवा पिठीला भरपूर स्वातंत्र्य मिळाले आहे. प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा मिळाली आहे, त्यामुळे त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये एवढेच आजच्या युवापिढीने लक्षात ठेवले पाहिजे.

अजिंक्य तरटे, नाशिक


सध्या स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार प्रत्यक्षात येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील १०० तरुण बनण्याचा प्रयत्न सध्याच्या काळातील तरुणांनी करायला हवा. आजही त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. सोशल साईटला आहारी गेलेल्या तरुणांनी त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

प्रसाद पाटील, पुणे
प्रथम माझ्या सर्व युवक मित्रांना युवक दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा..माझा एकच संदेश युवक दिनानिमित्त आहे की व्यसनाधीन होवु नका व आपल्या देशाला जागतिक महासत्ता देश बनविण्यासाठी आधुनिकीकरणाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेवुया. जरी आजचे युवक कोठेतरी भरकटले असले तरी मी स्वता सध्याच्या युवकांकडुन आशावादी आहे, ते नक्कीच कदाचित इतिहास घडवतिल...





(काही तांत्रिक कारणामुळे हा अंक उशिरा टाकत आहोत. तरी कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी - व्यवस्थापक)

Sunday, January 5, 2014

साथीदार - रौप्यमहोत्सवी व वर्धापन दिन विशेषांक

आजच आपल्या लाडक्या साथीदार ला २४ वर्ष पूर्ण होऊन २५ सावे 

म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे. खास आमच्या वाचकांसाठी 

साथीदार चा वर्धापन दिन आणि पत्रकार दिन विशेषांक ऑनलाईन ब्लॉग 

स्वरूपात देत आहोत. आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

मेल आयडी - dailysathidar@gmail.com, anilpaliwal25@gmail.com


आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. असेच प्रेम साथीदार ला 

देत राहा.....हीच अपेक्षा. - साथीदार परिवार.
----------------------------------------------------------------------


साथीदार - रौप्यमहोत्सवी व वर्धापन दिन विशेषांक






दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!

सु-प्रभात, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस 


विनम्र अभिवादन.......!!






तसेच सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......!!


- साप्ताहिक साथीदार परिवार

Saturday, December 21, 2013

आपला साथीदार - आपले विचार

लवकरच आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत, साथीदार एक नवीन स्वरूपात. गेल्या २३ वर्षांची वाचक परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपले विचार जाणण्यासाठी हा एक प्रयत्न.



- व्यवस्थापक, साप्ताहिक साथीदार

Tuesday, November 5, 2013

गेले ते दिन गेले....



दिन  दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी 
गाईम्हशी कोणाच्या, लक्शुमणाच्या
(होय हेच्च बरोबर आहे कारण आम्ही हेच मोठ्यामोठ्यानी ओरडत फिरायचो की गावभर)
अशी गाणी गात लहान मुले गल्लीत नाचायला लागली की दिवाळी जवळ आल्याची चाहुल लागायची. आता मात्र रोजच दिवाळी असल्याने याची गम्मत तितकीशी राहिली नाही.. यात मला पुर्वीचे आणी आत्ताचे असा फरक करायचा नाहीये पण........(हा 'पण' मोठा वाईट गड्या.... हाच सगळ्याची 'जड' आहे.......)

आमच्या वेळेला अस्सं आणी तुमच्या वेळेला तस्सं असे बोलुन मला तुम्हाला बोर करायचे नाही. पण ती मजा आज नाही हे सगळेच म्हणतात. कदाचित आत्ताची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला ही दिवाळी रंगवुन सांगतीलही. पण मला आठवते ती लहानपणीची दिवाळी.... खाउन पिउन सुखी असणार्‍या मध्यमवर्गीयांचे प्रमाण जास्त असण्याचा काळ तो......परिक्षा सुरु व्हायच्या आधीच या दिवाळीचे वेध लागायचे........बांबू आणायचा तो रात्रभर भिजत घालायचा दुसर्‍या दिवशी त्याच्या कामट्या करायच्या त्या चांदणीच्या आकारात बांधायच्या.... त्यावर घरी केलेल्या खळीने रंगीत कागद चिकटवायचा......खाली झिरमिळ्या जोडायच्या आणी चढवायचा आगलदिवा उंचचउंच .........दारात किल्ला बनवायचा. त्याला पायर्‍या करायच्या. हाळीव पेरायचे. छान गवत उगवले त्यावर की  खर्‍याखुर्‍या किल्ल्याचा भास व्हायचा. मग  मावळे विराजमान व्हायचे ........समोरच्या तळ्यात आणी झुडपात प्राणीही यायचे खेळण्यातले....... उत्साही दादालोक सलाईनच्या बाटलीपासुन कारंजंही बनवायचे.

हे सगळं सांघीक असायचे बरं का !  आता आपल्या  बंद दारामागे जगाच्या खिडकीत स्टेटस अपडेट करणारी प्रजा........शेजारच्या काकूंच्या मदतीला आई जायची अन ताईही. असे सगळे मिळून मिसळुन असायचे........कसे जपायचे ते स्पेस वगैरे ना!  एकत्र कुटुंब, येणारे पाहुणे यासाठी आजसारखा एक किलो विकतचा चिवडा कसा पुरेल? तो व्हायचा चांगला डबाभर.तीच गत करंजी लाडु अन चकलीचीही....... आत्तासारखे खुप पदार्थ अन मिठाईची रेलचेल नसेल् तेंव्हा.....कदाचीत आताप्रमाणे 12 महिने सगळे मिळत नसल्याने , मोजकेच  घरी बनणारे पदार्थ कधी खायला मिळतात यावर सगळ्यांचे लक्ष असायचे...... 

नवे कपडे, दागिने, वस्तु असे सगळे सणावाराला घ्यायची प्रथा असल्याने अप्रुप असायचे  सगळ्याचे. दाराशी पणत्यांच्या राशी ठेवणार्‍या ताई, आई, माम्या, मावश्या, काकवांचे चेहरे कामानी दमलेले दिसले तरी घरच्यांच्या कौतुकांच्या  नजरा   कृतकृत्य करायच्या त्यांना. दाराशी रेखाटलेली सुरेख रांगोळी पायात कचकच वाटत नव्हती ........

पैसा कमी होता, जागाही लहान. त्यात प्रायव्हसी तरी कितीशी असणार. पण बाबांच्या डोळ्यातुन ओसंडुन वाहणारे आईबद्द्लचे  अव्यक्त प्रेम तीच्या पर्यंत पोहोचायचेच.......आणि आता शुल्लक गोष्टींमुळे काडीमोड घेणारे पाहिले की किव येते. घेण्याबरोबरच देण्यातले सुख, अबोल प्रेम कसे कळणार यांना.........महागाई तेंव्हाही जाणवायचीच की, पण आत्तासारखं सगळं असून आतुन कायम तुटल्यासारखे नाही वाटायचे तेंव्हा..........फटाक्याची लड लावण्याऐवजी त्या मोकळ्या करुन एक एक वाजवण्यात मजा होती......... शेजारच्या मुलाकडे असणारे झाड किंवा भुईचक्र बघतानाही तेवढाच आनंद व्हायचा...... आपल्याकडे ते का नाही किंवा ते मी का नाही  लावले याबद्दल असुया आजच्यासारखी नव्हती.

तेंव्हा शेजारच्यांची वस्तु हक्कांने मागीतली जायची अन त्यांची ताई तिच्या दाखवण्याच्या कार्यक्रमात आपल्या आईची साडी नेसायची.....  माझे मला मी  हे जरा कमी होते बहुदा तेंव्हा......... काका बॅंडवाल्यासारखा सगळ्यांना एकाच प्रकारचे फ्रॉक घ्यायचा ते ही छानच वाटायचे. आजसारखे कधीही मॉलमध्ये जाउन खरेदी करायची पध्द्त नव्हती तेंव्हा. आणि एकत्र कुटुंबांमुळे सगळ्यांचा आपसुकच विचार व्हायचा.....

ते चांगले. हे वाईट. असे नाही म्हणायचे मला. ही कालगती आहे. त्याबरोबर चालावे तर लागणारच. आजचे सगळेच वाईट आहे असेही नाही. पण एखादी गोष्ट मिळण्यासाठीचा संयम संपतोय का आपला...आज आत्ता ताबडतोब हे किती योग्य?

पुर्वी कोकणात दोन आकाशकंदिल बनवायचे म्हणे...... पायाखाली किरट फोडायचे नरकासुराचा वध म्हणुन..... अभ्यंगस्नानाला खसखशीचे बदामाचे  वाटण  उटणे म्हणुन लावायचे..वासाचे तेल आणी साबण वर्षाकाठीच यायचा ना घरात....... म्हणुन कोण कौतुक........अंगाला तेल लाउन उनउन पाण्याची पहाटेची आंघोळ ......... मग फराळावर आडवा हात .........काय मजा होती ओ.. आत्ताही यातले बरेचसे घडतेच. प्रत्येकाला त्याची पहीली दिवाळी अन दिवाळसण महत्वाचा असतोच.

पण काकुला रगडुन तेल लावायला सांगणारा काका, आपल्या गृहलक्ष्मीला, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घसघशीत  ओवाळणी घालायचा. ते बघुन घरातल्या लक्ष्मीला मान द्यायला पुढची पिढी आपसुकच शिकायची..... भावाच्या तावडीतुन या दिवसात सुटका नसली तरी सगळ्या दादुटल्यांकडुन मिळणारी ओवाळणी हा तर आनंदाचा ठेवाच असायचा. आता सख्खा भाउ परदेशी असल्याने व्हर्च्युअल ओवाळण्याच्या दिवसात इतर भावांची तर बातच नको.

काहीतरी मुठीतून सुटणार्‍या वाळूसारखे हुरहुर लावणारे आहे..... हेच खरे! (पण हेच वास्तव आहे म्हाराज..........! चला मॉल मध्ये चक्कर मारावीच लागणार फारच एकटे वाटतेय ओ......)
                                                                                                                                                                                   
                                                                                                                         - भाग्यश्री कुलकर्णी