Tuesday, November 5, 2013

दिवाळी कां ?



दिवाळी आली की आपण आवर्जून उत्साहाने रांगोळी, दिवे आणि फराळाचे करतोच.
आपली दिवाळी गाई गोऱ्ह्याच्या बारसपासून सुरु होते. नरक चतुर्दशी आणि दिवाळी ची अमावस्या त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज. नरक चतुर्दशी ला भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला, आसुरी शक्ती म्हणजे शक्ती चा अयोग्य ठिकाणी वापर . शक्ती चा सदुपयोग म्हणजे देवाचा विजय.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळोखात अनेक आकाशदिवे उजळत असतात आणि अंधाराचा नाश हे सुचवत असतात. लक्ष्मीपूजनाची रात्र महारात्र अशी संबोधली जाते . होळीची रात्र देखील महारात्र आहे. पण या दोन्ही रात्रीना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नेमके विरुद्ध दिशांना असल्याचे सिध्द झाले आहे. बळी-राजाचा पराभव करून बटू वामनाने म्हणजे विष्णूनी महालक्ष्मीची सुटका केली आणि बळी दैत्यांचा राजा ह्यास पाताळात घातले म्हणजे पृथ्वीपासून दूर नेले यामुळे  पृथ्वी दाबली गेली तिचे गुरुत्वाकर्षण वाढले. 

हा आनंदोत्सव दिवे लावून  साजरा करण्याची पद्धत पडली. दिवाळीच्या पाडव्याला गोवर्धनाची पूजा करतात. गोवर्धन पर्वत शेणाचा किंवा अन्नकुट असा बनवतात.
कृष्णाच्या कथांमध्ये पर्यावरण जपण्याचा कितीतरी मोठा हेतू स्पष्ट होतो. गोवर्धनाची पूजा म्हणजे डोंगराची पूजा. मान्सूनचे वारे भारतात जून च्या सुरवातीस वाहू लागले कि पश्चिमघाटातील सह्याद्रीच्या डोंगरांमुळे अडवले जातात आणि मग पाउस पडतो. आपला पश्चिम घाट आता जागतिक वारसा झाला आहे. भगवान श्रीकृष्णांनी नेमके हेच ओळखून गोवर्धनाची पूजा केली असावी.

आपले पूर्वज आणि पद्धती सगळ्याच काही टाकाऊ नाहीत. गरज आहे त्या कां घालून ठेवल्यात , त्या पद्धती कां पडल्या ह्याचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याची.
मग ह्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ती जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा.
                                             
                                                            - डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक

No comments:

Post a Comment