Tuesday, December 4, 2012

'' कण्हेरीची फुले '' : विश्वविक्रमी '' मराठी ब्रेथलेस '' अल्बमचे पुण्यात शानदार सोहळ्यात प्रकाशन

 '' कण्हेरीची फुले ''या विश्वविक्रमी '' मराठी ब्रेथलेस '' अल्बमचे
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या  एका शानदार
सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.  सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी एका
श्वासात म्हटलेले गाणे तसेच प्रसिद्ध अभिनेता
 अमोल कोल्हे याने एका श्वासात केलेले अभिवाचन पडद्यावर
ध्वनीचित्रफितीद्वारे ऐकल्यानंतर सभागृहातील रसिक श्रोत्यांनी प्रचंड
टाळ्यांच्या गजरात  'युनिव्हर्सल  मूझ्यिक ग्रुप' च्या या अभिनव उपक्रमाचे
कौतुक केले.


 प्रारंभी अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांच्या हस्ते या ''
मराठी ब्रेथलेस '' गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी
व्यासपीठावर गायिका बेला शेंडे, गायक प्रसेनजीत कोसंबी, निर्माते आणि
गीतकार शंकर जांभळकर , संगीतकार तेजस चव्हाण, कवयित्री आणि
दिग्दर्शिका प्राजक्ता गव्हाणे, 'युनिव्हर्सल  मूझ्यिक ग्रुप' चे राजन
प्रभू आणि इतर तंत्रद्य व कलाकार उपस्थित होते.  गायक
प्रसेनजीत कोसंबी यांच्या या अल्बममधील गीतानेच या कार्यक्रमाला सुरुवात
झाली. निवेदिका तेजश्री धारणे हिने यावेळी खास शैलीत घेतलेल्या मुलाखतीत
गायिका बेला शेंडे, प्रसेनजीत कोसंबी,  गीतकार शंकर
जांभळकर , संगीतकार तेजस चव्हाण, आणि दिग्दर्शिका प्राजक्ता
गव्हाणे यांनी '' कण्हेरीची फुले '' या अल्बमचा प्रवास कथन केला.
       बेला शेंडे यांनी यावेळी सांगितले की, कवयित्री प्राजक्ता गव्हाणे आणि
संगीतकार तेजस चव्हाण यांनी जेंव्हा अडीच पानाचा मजकूर असलेले गाणे वाचून
दाखविले आणि ते  एका श्वासात म्हणायचे आहे असे सांगितले तेंव्हा मला
स्वत:ला ते खूप आव्हानात्मक वाटले. एक वेगळा प्रयोग म्हणून त्यापाठीमागील
त्यांच्या प्रामाणिक भावना मी ओळखल्या आणि सतत दोन महिने सराव करून ते '
ब्रेथलेस गाणे' अखेर गायले. गाव आणि शहर यांना जोडणाऱ्या त्या गाण्याचे
शब्द इतके सुंदर होते के, गाताना अनेक जुन्या गोष्टी आठवत गेल्या असेही
तिने आवर्जून सांगितले. गायक प्रसेनजीत कोसंबी यानेही या गाण्यातुंन
गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यामुळे गाणे गाताना एक वेगळ्या
प्रकारचा आनंद मिळाला अशी भावना व्यक्त केली.




निर्माते आणि गीतकार शंकर जांभळकर यांनी, अंतर्मनाच्या उर्मीतून निर्माण झालेल्या
भावना गीतांच्या रूपातून या अल्बममधील गाण्यात व्यक्त झाल्याचे सांगितले. तर संगीतकार तेजस
चव्हाण आणि दिग्दर्शिका प्राजक्ता गव्हाणे या दोघांनीही  '' मराठी ब्रेथलेस '' बाबत खूपच उत्सुकता होती
व त्यासाठी खूप मेहनत घेवून सर्वांच्या सहकार्याने मराठीतील हा वेगळा प्रयोग
यशस्वी करून दाखविल्याचे सांगितले. तेजस चव्हाण याने यावेळी या अल्बममधील
गाणेही म्हणून दाखविले त्यालाही रसिक श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली.

    यावेळी या अल्बममध्ये गाणे गाणारे जेष्ठ गायक सुरेश वाडकर तसेच
ब्रेथलेस अभिवाचन करणारे डॉ. अमोल कोल्हे आणि ज्यांच्या हिंदी ब्रेथलेस
गाण्यावरून प्रेरणा घेवून हा  अल्बम तयार करण्यात आला ते प्रसिद्ध गायक
शंकर महादेवन यांनीही पडद्यावर ध्वनीचित्रफितीद्वारे या प्रकाशन सोहळ्याला
खास शुभेच्छा दिल्या. मराठी साहित्य विश्वात प्रथमच ''  ब्रेथलेस '' सादर
 करणाऱ्या '' कण्हेरीची फुले '' या अल्बमची ' लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रेकौर्ड ' नेही दखल घेतली
 आहे. शहरात कष्ट करून दमलेल्या तरीही गावकुसाच्या आठवणींनी व्याकूळ
होणाऱ्या रुखरूखणाऱ्या मनाची होरपळ या अल्बममधील
गीतांमधून तरलतेने मांडण्यात आली आहे.

Wednesday, November 28, 2012

दिवाळी विशेषांक : आपला सर्वांचा साथीदार चा दिवाळी अंक आत्ता ऑनलाईन खास वाचकांसाठी सादर






साप्ताहिक साथीदाराचा दिवाळी अंकाचे प्रकाशन चोपडा नगरीचे नगराध्यक्ष संदिपभैया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साथी दारचे मुख्य संपादक अनिलकुमार पालीवाल, महाराष्ट्र पालीवाल समाज अध्यक्ष कांतीलालजी पालीवाल, साथीदार संपादक अमृतराज सचदेव, चोपडा तालुका सेवाभावी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, लतीश जैन, हितेंद्र साळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अनिलकुमार पालीवाल यांनी रौप्यमहोत्सवाकडे साथीदारची वाटचाल थोडक्यात सांगितली. भैयासाहेबांनी साथीदार परिवाराचे खास कौतुक केले. गेल्या २२ वर्षापासून चोपड्यासारख्या छोट्याश्या तालुक्यातून एक साप्ताहिक टिकवणे आणि ते निरंतर चालू ठेवणे हे खरोखरच उल्लेखनीय बाब असल्याचेही त्यानी सांगितले.

यावेळचा दिवाळी अंक हा नेहमीप्रमाणे वाचनीय आणि संग्रही नक्की राहील हीच अपेक्षा बाळगतो.
- व्यवस्थापक 


Sunday, August 19, 2012

दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

वाचकांनी तसेच लेखकांनी आणि सर्व जाहिरातदारांनी आपल्या लाडक्या साथीदारच्या दिवाळी २०१२ च्या दिवाळी अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या, मुलाखती आपल्या छायाचित्रासह पाठवावेत. तसेच जाहिराती लवकरात लवकर पाठवाव्यात . या वेळचा दिवाळी अंक हा ऑनलाइन आणि पुस्तक स्वरुपात निघणार असून आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे. तरी लेखकांनी आपले लेख, कविता, चारोळ्या लिहून आणि कार्टून्स काढून पोस्टाने अगर pdf file किंवा scan करून mail कराव्यात. जाहिरातदारांनी आपले जाहिरातीचे आर्टपूल pdf or Jpg format मध्ये mail ला जोडून पाठवावे. शेवटची तारीख :- १५ ऑक्टोबर २०१२
  संपर्क:- अनिलकुमार डी. पालीवाल,
मुख्य संपादक, साप्ताहिक साथीदार
१२३-ब ,बाबूजी निवास ,बडगुजर गल्ली,
चोपडा -४२५१०७,
जळगाव, महाराष्ट्र
भ्रमणध्वनी :- ९४२३५६३८९२
-----------------------------------------
गोपाल अनिल पालीवाल
७, महालक्ष्मी अपार्टमेंट, महालक्ष्मी नगर,
हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक-४२२००३
भ्रमणध्वनी :- ९४२३४९१८२३
-----------------------------------------
Mail ID :-
dailysathidar@gmail.com,
paliwal.gopal4u@gmail.com

Friday, June 15, 2012

आ. अरुणभाई गुजराथी आणि श्री.विठ्ठलकाका गुजराथी वाढदिवस विशेषांक

आ. अरुणभाई गुजराथी आणि श्री.विठ्ठलकाका गुजराथी वाढदिवस विशेषांक
साप्ताहिक साथीदार परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ............!!!!




  शुभेच्छुक

प्रा. जैमिनी कडू
अनिलकुमार पालीवाल
अमृतराज सचदेव
सौ. किरण अनिलकुमार पालीवाल
साथीदार परिवार 

Friday, February 17, 2012

आता पर्यंतच्या जागांचा निकाल खास आपल्यासाठी :-

आता पर्यंतच्या जागांचा निकाल खास आपल्यासाठी :-

चोपडा Election Of जिल्हा परिषद :-

NCP :- 3

Congress :- 1

Sena :- 2

BJP :- 0


पंचायत समिती :-


NCP :- 7

Congress :- 1

Sena :- 2

BJP :- 1

Apaksh :- 1

- Sathidar Buereu.

Saturday, January 7, 2012

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -IV

मत्स्योत्पादन :

महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, रेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.


४) भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन


० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.

५) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्‍‌र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लोही, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अ‍ॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.


(Source :- Loksatta Career Counselor)

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -III

कृषीविषयक घटक

० भारतातील ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ ही संस्था जमिनीची मोजणी करून आकडेवारी प्रसिद्ध करीत असते. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण ९२.७ टक्के जमिनीचे मापन करणे शक्य झाले आहे.
० भारतातील एकूण जमिनीचे आकारमान ३२.८७ कोटी हेक्टर आहे. यापैकी ३०.४४ कोटी हेक्टर जमिनीचे मापन करण्यात आले आहे.
० भारतातील उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. प्रत्यक्ष लागवडीखालील असलेल्या जमिनीपैकी २० टक्के जमिनीवर दुबार पिके घेतली जातात.
० लागवडीखालील निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. तर दुबार पिके घेण्याबाबत महाराष्ट्राचा भारतात १८ वा क्रमांक लागतो.
० महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१ टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. राज्यातील वनक्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्र विदर्भात, पाच टक्के मराठवाडय़ात व ३९ टक्के क्षेत्र उर्वरित महाराष्ट्रात आहे.
० भारतीय संविधानाच्या कलम ५१ (९) (जी) प्रमाणे वने, नद्या, जलाशय व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
० २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ५२ टक्के जनता स्वयंपाकासाठी जळावू लाकडावर अवलंबून आहे.
० भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५४ टक्के हे पिकाखाली क्षेत्र, आठ टक्के क्षेत्र दोन ते तीन वर्षांनी लागवडीखाली, १३ टक्के जमीन पडीक तर २२ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे. एकूण लागवडीच्या ७६ टक्के क्षेत्र निव्वळ अन्नधान्य उत्पादनासाठी वापरले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पदनाच्या २६.५ टक्के उत्पादन कृषी साधनापासून मिळते म्हणून भारत कृषीप्रधान देश आहे.
० भारत देश हा १९७४ साली अन्नधान्य उत्पादनात स्पयंपूर्ण झाला तर १९७७ मध्ये प्रथम अन्नधान्य निर्यात केले.
० तांदूळ हे देशातील महत्त्वाचे पीक मानले जाते. तांदूळ उत्पादक देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी २१.६ टक्के उत्पादन भारतात होते. भारतात तांदळाचे पंजाब, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू ही तीनच राज्ये उच्च उत्पादकता असलेली राज्ये ओळखली जातात.
० तांदळाच्या नवीन सुधारित प्रचलित जाती- अभिषेक, भूतनाथ, चंद्रमा, इंदिरा सोना, सम्राट.
० चुरमुरे, पोहे तयार करण्यासाठी तांदळाची जात- राधानगरी १८५-२
० ‘सुवर्णा सबमर्जन्स-१’ ही तांदळाची नवी जात पूरप्रतिबंधक असून मोठय़ा पुरातही टिकून राहणारी आहे. (फिलिपाईन्समधील मनिला येथील संशोधकांनी शोधून काढली.)
० महाराष्ट्र देशात साखर उद्योगात आघाडीवर असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३६ ते ४० टक्के साखर उत्पादन होते. महाराष्ट्रात एकूण १९३ साखर कारखाने आहेत.

२) फलोत्पादन : नारळ हे उष्ण कटिबंधीय पीक आहे. नारळाच्या जागतिक उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक इंडोनेशिया, दुसरा क्रमांक फिलिपाइन्स व तिसरा- भारत.
० महाराष्ट्रात ३२,००० हेक्टर (२००९) क्षेत्र नारळाखाली आहे.
० भारताची सरासरी प्रतिहेक्टर नारळ उत्पादन क्षमता ६६३२ आहे.
० नारळाच्या जाती- ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, यलो डॉर्फ, बाणवली (उंच जात)
० २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
० चिंच- महत्त्वाची जात- प्रतिष्ठान (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
० आंब्याच्या महत्त्वाच्या जाती- हापूस, रत्ना, मल्लीका, आम्रपाली, सिंधू इ.
० केळीच्या जाती- बसराई, हरिसाल, सालवेलची, सफेद वेलची, राजेडी इ.
० मोसंबीच्या प्रचलित जाती- न्यूसेलर, मालगुडी, जाफा, वॉशिंग्टन नॉवेल, सातगुडी इ.
० डाळिंबाच्या जाती- गणेश (डीबीजी-१), मस्कत, डोलका, काबूल, आळंदी इ.
० चिक्कूच्या महत्त्वाच्या जाती- क्रिकेट बॉल, कोईमतूर-१, पिल्ली पत्ती, बंगलोर इ.
० द्राक्ष- माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन सिडलेस, शरद सिडलेस, किसमिस बेरी इ.
० नाशिक जिल्ह्य़ात पिंपळगाव बसवंत व पुणे जिल्ह्य़ात नारायणगाव येथे श्ॉम्पेन तयार करतात.
० पेरू- सरदार, धारवाड, बनारसी, कोथरूड, लखनऊ २९, नाशिक इ.
० अंजिर- पूना अंजीर, काबूल, लखनौ, मार्सिलीस, ब्राऊन
तुर्की इ.
० महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात अहमदनगर जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक लागतो.
० अननसाचे उगमस्थान- ब्राझील
० काजूचे उगमस्थान- ब्राझील.
० मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात- पांढुर्णा.
० संपूर्ण भारतात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश (६० टक्के) मध्ये होते.
० चिक्कू झाडाचे मूळस्थान- मेक्सिको
० आंब्याचे मूळस्थान- वायव्य आशिया
० डाळिंबाचे मूळस्थान- इराण
० अंजीराचे मूळस्थान- दक्षिण अरेबिया
० काजूचे मूळस्थान- ब्राझील
० फळांचे अभ्यास करणारे शास्त्र- पोमोलॉजी

(Source - Loksatta Career Counselor)

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -II

क्रीडाविषयक

० २०१० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोची केरळ येथे पार पडणार आहे.
० २०१० मध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत (नवी दिल्ली)
० जागतिक युवा व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. विजेता संघ : ब्राझील, उपविजेता : क्युबा
० २००९ फ्रेंच ओपन टेनिस : रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवा
० आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष : लिअ‍ॅद्रो नेग्री
० आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष : जोसेफ ब्लॅटेर
० रोम येथे पार पडलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत चीनच्या झाओजिंगने विश्वविक्रम केला.
० संदीप शेजवळ व वीरधवल खाडे भारताचे जलतरणपटू आहेत.
० सोमदेव देववर्मन हा खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० सुदीरमन करंडक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
० नेहरू करंडक फुटबॉल खेळाशी संबंधित आहे.
० अझलन शहा कप हॉकी खेळाशी संबंधित आहे.
० सानामाचा चानू व प्रतिमा कुमारी वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित आहे.
० सायकलिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीत स्पेनचा अल्बर्ट कोन्टाडोर याने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.
० शरथ कमल टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० चवथ्या जागतिक मिलिटरी स्पर्धा (२००७) हैदराबाद येथे पार पडल्या.
० देवधर चषक, दुलिप करंडक, इराणी चषक, रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
० ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदक पटकावले.

संरक्षणविषयक

० भारतीय नौसेनेची संपूर्ण विश्वभर भ्रमण करणारी बोट : आयएनएस तरंगिनी.
० भारताच्या ‘अग्नी १’ या समकक्ष पाकिस्तानचे क्षेपणास्त्र : घौरी
० भारताचे पहिले वैमानिकरहित विमान : लक्ष्य
० जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र : पृथ्वी, अग्नी, नाग
० जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र : आकाश, त्रिशूल, ब्राह्मोस
० ध्वनीच्या तिप्पट वेगाने २९० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणारे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपमे विकसित केलेले ‘ब्राह्मोस’ हे सुपरसोनिक जहाजभेदी क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
० अमेरिकन बनावटीची वैमानिक विरहित विमाने : चकोर
० सूर्य हे ५००० कि.मी. पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.
० भारतीय हवाई दलात महिला वैमानिकांचा समावेश : १७ डिसेंबर, १९९४ पासून.

अर्थ व वाणिज्यविषयक

० भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार अमेरिका देशाशी आहे.
० भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा देश : मॉरिशस, दुसरा-अमेरिका, तिसरा-जपान
० जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था : चीन, दुसरा-भारत.
* भारतात दारिद्रय़ रेषेखालील लोकांचे सर्वाधिक प्रमाण : ओरिसा (४६.४०टक्के)
० भारतात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य : महाराष्ट्र
० मंदी आणि आर्थिक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करण्याचा भारताचा जगात ऑस्ट्रेलिया, चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.

शैक्षणिकविषयक व आरोग्यविषयक

० भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा : मल्लापुरम (केरळ)
० भारतीय संशोधकांनी म्हशीचे जगातील दुसरे क्लोन तयार केले असून ‘गरिमा’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पहिले क्लोन ‘गौरी’ याच संशोधकांनी निर्माण केले होते.
० स्वाईन फ्ल्यू हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या H1N1 या विषाणूमुळे होतो. मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण २१ एप्रिल, २००९ रोजी आढळला. H1N1 हा विषाणू इवसन संस्थेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो.
० मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
इतर प्रश्न
० भारताची १०१ वी घटना दुरुस्ती जीवनावश्यक वस्तूंबाबत असून १०३वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याबाबत आहे.
० राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना : २३ फेब्रुवारी, २००७.
० भारत-पाक रेल्वे सेवा : समझोता एक्स्प्रेस
० भारत-पाक बस सेवा : साद-ए-सरहद, कारवाँ-ए-अमन
० भारत-बांग्लादेश रेल्वे सेवा : मैत्री एक्स्प्रेस
० विविध आयोग व समिती:
० बाबरी मशीद प्रकरण : लिबरहान आयोग
० गोध्रा हत्याकांड : नानावटी आयोग
० निवडणूक सुधारणाविषयक समिती : व्ही. एम. तारकुंडे समिती
० मतदारसंघ पुनर्रचना आयोग : न्या. कुलदीप सिंह
० महत्त्वाची योजना:
० मांगल्यसूत्र योजना : ही योजना अल्पदराची योजना असून केरळ राज्यामध्ये मुलीच्या लग्नामुळे तिच्या वडिलांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारने राबविलेली योजना.

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes

संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न
* सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.
* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.
* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.
* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.
* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.
* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता- ७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.
* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.
संरक्षणविषयक घडामोडी
* सध्या भारताशी संरक्षण सामग्रीच्या विक्रीबाबत इस्राइल देश आघाडीवर आहे.
* २००९ मध्ये भारत सरकारने इजिप्त देशाशी गुन्हेगार हस्तांतरण करार केला.
* सेजील या अग्नीबाणाची चाचणी इराण देशाने घेतली.
* २००९ मध्ये चाचणी घेतलेले ‘शौर्य’ भारताचे क्षेपणास्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
* जानेवारी २००९ मध्ये भारत व रशियादरम्यान पार पडलेल्या नौदल कवायती- इंद्र.
* ‘बैकानूर’ हे अवकाश प्रक्षेपण स्थळ कझाकिस्तान देशात आहे.
* जहाजविरोधी क्षेपणास्त्र ‘हार्पून-२’ हे भारताला अमेरिका देशाकडून मिळणार आहे.
* भारताने ‘गोर्शकोव्ह’ ही युद्धनौका रशिया देशाकडून खरेदी केली.
* भारत व फ्रान्स संयुक्तपणे विकसित करीत असलेले क्षेपणास्त्र- मित्र.
अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी
* चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते.
* स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली.
* जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश- डेन्मार्क.
* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.
* अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.
* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा.
* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.
* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश.
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.
* युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.
क्रीडाविषयक घडामोडी
* ‘बटरफ्लाय’ हा प्रकार जलतरण खेळाशी संबंधित आहे.
* ‘डकवर्थ लुईस नियम’ क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
* ‘तरुणदीप राय’ हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे.
* क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य- महाराष्ट्र.
* २०१० ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा- दक्षिण आफ्रिका.
* ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
* बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय- अभिनव बिंद्रा.
* चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
महत्त्वाचे दिवस
* २३ मार्च- जागतिक हवामान दिन * १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन * २४ मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन * ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन * १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन * १५ मार्च- जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च- जागतिक वन दिन * ५ जून- जागतिक पर्यावरण दिवस * २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन * ६ जानेवारी- पत्रकार दिवस * ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन * २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका दिन * २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस
महत्त्वाची समिती व आयोग
* सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली.
* राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
* गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती- फतेचंद बन्सल समिती.
* नर्सरी शाळेतील प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी- अशोक गांगुली समिती.
* अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी- राजेंद्र सच्चर समिती.
* भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती- नरेशचंद्रा समिती.

महत्त्वाची पुस्तके
* एन्ड ऑफ हिस्ट्री- फ्रान्सिस फुकुयामा
* ए ट्रेन टू पाकिस्तान- खुशवंत सिंग
* ए मिशन इन काश्मीर- नमिता देवीदयाल
* डॉटर ऑफ द ईस्ट- बेनझीर भुट्टो
* ए लॉग वॉक टू फ्रिडम- नेल्सन मंडेला
* विंग्स ऑफ फायर- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग

भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
डॉ. नरेंद्र जाधव समिती- विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
राम प्रधान समिती- २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
माधवराव चितळे समिती- मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या कल्याणाकरिता
न्या. बापट आयोग (२००८)- मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
न्या. सराफ आयोग (२००९) मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
न्या. राजन कोचर समिती- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
डॉ. अभय बंग समिती- कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता
अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.
देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
प्रा. वि. म. दांडेकर समिती- प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी
द. म. सुकथनकर समिती (जून १९९६)- मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या- इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी व उपाय सुचविण्यासाठी
डॉ. विजय केळकर समिती- देशातील साखर उद्योगाचा सर्वागीण आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेमलेली समिती
व्ही. रंगनाथन समिती- महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचनाचा तालुका निहाय अनुशेष निश्चित करण्यासाठी व निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती
* नंदलाल समिती- नागपूर महानगरपालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी
प्रमोद नवलकर समिती- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने अल्पवयीन वेश्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती
प्रा. जनार्दन वाघमारे समिती- नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती
पी. एस. पाटणकर समिती- महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी
वसंत पुरके समिती (२००८)- शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती
सुनील तटकरे समिती (२००९)- रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती
अशोक बसाक समिती- दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
न्या. राजिंदर सच्चर समिती- मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती
जगदीश सागर समिती (१९९५)- नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी
के. नलिनाक्षण समिती - ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
नंदलाल समिती- ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती
न्या. बी. एन. श्रीकृष्ण- सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
न्या. कुलदीपसिंग समिती - मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी
लिबरहान आयोग बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती- गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
मणिसाना आयोग- पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ

संकलन- प्रशांत देशमुख
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

महाराष्ट्र माझा

* केंद्र- राज्य संबंध आयोग- भारत सरकारने २७ एप्रिल २००७ ला केंद्र राज्य संबंध आयोग स्थापन केला, आयोगाचे अध्यक्ष होते मदनमोहन पंछी
* वर्मा समिती- राजीव गांधी हत्येची चौकशी
* न्या. भगवती समिती - भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी
* जानकी रामन समिती (१९९२)- रोखे गैरव्यवहारप्रकरणी रिझव्‍‌र्ह बँकने नेमलेली समिती
* न्या. सरकारिया आयोग- केंद्र राज्यसंदर्भात नेमलेला आयोग
* जे. एम. लिंगडोह समिती- कॉलेजमधील निडवणुकांची आचारसंहिता ठरवण्यासाठी
* डॉ. भालचंद्र मुणगेकर समिती- सेट व नेट परीक्षांची अनिवार्यता तपासण्यासाठी
* डॉ. यू. म. पठाण समिती (२००९) राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा समावेश करण्याकरिता.
* आर. के. राघवन् समिती- उच्चशिक्षण संस्थांतील रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने नेमलेली समिती
* मुखोपाध्याय समिती - महाराष्ट्रात दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्तीबाबत
* सुबोध जयस्वाल समिती - बनावट मुद्रांक घोटाळा चौकशीप्रकरणी नेमलेली समिती
* सोली सोराबजी अभ्यास गट - भारताच्या पोलीस यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी
* पी. एन. टंडन समिती- देशभरातील अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्यासाठी
* डॉ. राजेंद्र पचौरी समिती - सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली समिती
* यशपाल समिती - अभिमत विद्यापीठांचा दर्जा रद्द करण्यासाठी शिफारस केलेली समिती
* बी. के. चतुर्वेदी समिती (२००८) - भारतातील खनिज तेल कंपन्यांची वित्तीय स्थिती तपासण्यासाठी
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण - तेलंगणा वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मंजुळा कृष्णन समिती - उत्तर प्रदेशातील निठारी बाल हत्याकांडप्रकरणी चौकशी करण्यासाठी
परीक्षाभिमुख विविध मोहिमा-ऑपरेशन्स
* ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नरीमन हाऊस वरील दहशतवाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायक्लॉन- मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजवरील दहशत वाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायलेन्स - पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद येथील लाल मशिदीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन ऑल क्लियर - आसाममधील उल्फा दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने चालविलेली मोहीम.
* ऑपरेशन ग्रीनहंट- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगढ व झारखंड या राज्यांतील जंगलव्याप्त प्रदेशात असणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन सुकुन- लेबनॉनमधील भारतीय नागरिकांना परत बोलविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आपत्कालीन मोहीम.
* ऑपरेशन ककून - विरप्पनला पकडण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेड डॉन- सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन गरुड - नक्षलवाद्यांविरुद्ध छतीसगडमध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन बजरंग- उल्फा अतिरेक्यांविरुद्ध आसाममध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन कोब्रा गोल्ड- थायलंडमध्ये अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सहायता - नर्गिस या वादळाचा तडाखा
बसलेल्या म्यानमारला भारतीय लष्करातर्फे पाठविलेल्या मदत कार्यक्रमाचे नाव
* ऑपरेशन डेनिम (२००४)- श्रीलंकेत आलेल्या पुरामध्ये तेथील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पाशा- भारत व श्रीलंकादरम्यान होणाऱ्या औषधांची व इतर वस्तूंची चोरटी वाहतूक व व्यापार रोखण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पुशबॅक- भारतात बांग्लादेशातून आलेल्या चकमा शरणार्थीविरुद्ध व त्यांना हाकलून लावण्यासाठी भारत सरकारने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन मुश्तरक- अमेरिकन सैनिकांच्या नेतृत्वाखाली नाटो आणि अफगाणी सेनेने तालिबान विरोधी चालविलेली लष्करी मोहीम.
* ऑपरेशन ब्लॅक गोल्ड- अफूचा बेकायदा व्यवहार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राजस्थान पोलिसांनी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन फ्लॅशआऊट- बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून शोधून काढण्यासाठी राबविलेली मोहीम.
केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या व विविध ऑपरेशन्स :
* डॉ. आ. ह. साळुंखे समिती - महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मधुकर चव्हाण समिती - महाराष्ट्र विधानसभेतील आमदार निलंबनप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष.
* डॉ. एम. एस. स्वामीनाथन समिती - कमी खर्चात अधिक शेती उत्पादन काढता यावे याकरिता पुढील २५ वर्षांकरिता तयार केलेल्या आराखडय़ाचे अध्यक्ष.
* किरीट पारेख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमती निर्धारण करण्यासाठी.
* प्रमोद आचार्य समिती - आयआयटी प्रवेश परीक्षेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मानवी संसाधन मंत्रालयाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष.
* तमांग समिती - गुजरातमधील इशरतजहाँ व इतर तिघांची पोलीस चकमकीत झालेल्या हत्येची चौकशी करण्यासाठी.

संकलन- प्रशांत देशमुख
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

कुटुंबवत्सल - जमुनाबेन गुजराथी

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या मातोश्री जमुनाबेन गुजराथी यांचे काल (ता. 6) निधन झाले. त्यानिमित्त...

जमुनाबेन गुजराथी यांचा जन्म एक नोव्हेंबर 1910 ला झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह चोपडे येथील स्वातंत्र्य सैनिक गोवर्धनदास भिकारीदास शहा ऊर्फ मगनभाई (बाबाजी) यांच्याशी झाला. त्यांचे शिक्षण अल्प असले, तरी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे पती बाबाजी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या कार्यात त्यांचेही पूर्ण सहकार्य होते. या काळात त्यांच्या निवासस्थानी महात्मा गांधींनी भेट दिली होती. स्वातंत्र्य चळवळीविषयी मार्गदर्शन केले होते. पूज्य साने गुरुजी भूमिगत असताना त्यांचाही सहवास त्यांना लाभला होता. त्यांच्या विचाराही प्रभाव त्यांच्यावर होता.

जुन्या जमान्याच्या जमुनाबेन धार्मिक व सनातनी कुटुंबात जन्माला आल्या असल्या, तरी आधुनिक विचारसरणी स्वीकारण्याची त्यांची वृत्ती होती. कुटुंबात मुलांवर संस्कार त्यांनी घडवले. बाबाजींच्या मार्गदर्शनामुळे स्वातंत्र्य आंदोलनात कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे त्यांच्या निवासस्थानी येणे जाणे होते. याच्यातून या नेत्यांच्या विचारांचा प्रभाव व परिचय त्यांना झाला. त्यांचा स्वभाव कोणाशी वैर करण्याचा नव्हता. कोणाची निंदा करणे त्यांना आवडत नसे. कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रसन्न मुद्रेने त्या स्वागत करीत.

जमुनाबेन यांचे व माझे आजोबा (कै.) स्वातंत्र्य सैनिक मगनलाल नगीनदास यांचे भावा-बहिणींचे नाते होते. त्या माझ्या मावशी कमलबेन यांच्या सासू होत्या. सुनांना मुलीसारखे वागवण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी 1947 मध्ये महाराष्ट्र महिला परिषदेचे आयोजन करून त्याचे स्वागताध्यक्षपद भूषविले होते. महिलांच्या अनेक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. महिला परिषदांच्या निमित्ताने जळगाव, नाशिक, पुणे या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. महिलांनी शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत होते. भगिनी मंडळ या संस्थेची त्यांनी यासाठी स्थापना केली. 1962 च्या दुष्काळात एक आण्यात भाजी-भाकरीचे आयोजन बाबाजींनी केले. त्यात त्यांचा मोठा वाटा होता. पूज्य विनोबा भावे यांच्या सर्वोदय चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या अनेक राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांनी बाबाजींसोबत उपस्थिती दिली. जमुनाबेन कुटुंबवत्सल होत्या. गेल्या दोन वर्षापूर्वी शंभरी पार केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी आवाहन करताना व सदिच्छा देताना आपणही चांगले काम करा व यातून मोठे व्हा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. त्या गांधीवादी विचारांच्या होत्या.

जीवनाच्या अखेरपर्यंत खादीची साडी परिधान केली. "खादी वस्त्र नव्हे तर विचार' ही भावना त्यामागे होती. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या हीरक महोत्सवी अधिवेशनात उत्तम काम केल्याबद्दल त्यांना चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा सोशल वेल्फेअर बोर्डावर सदस्या म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अशा प्रेमळ व कुटुंबवत्सल जमुनाबेन यांच्या कुटुंबात विठ्ठलदास, वसंतलाल, डॉ. वल्लभदास, अरुणभाई असे चार भावंडे डॉ. सुशिलाबेन शहा, कमलबेन अशा तीन बहिणी एकत्र कुटुंबाचा एक आदर्श गावालाच नव्हे तर तालुक्‍याला होता. त्यांचे घर म्हणजे तालुक्‍याच्या गोरगरीब लोकांचे एक आपुलकीचे नाते जोडणारे होते.

जमुनाबेन यानी बाबाजींबरोबर गोरगरिबांची सेवा करताना कुटुंबातील सभासदांवर संस्कार टाकताना त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत सेवाभाव करुणा, प्रेम या तत्त्वांचा समन्वय सोडला नाही. अशा प्रकारच्या जमुनाबेन ऊर्फ मोठ्या आई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- माधुरी मयूर, सचिव, चोपडे शिक्षण मंडळ, चोपडा.

Tuesday, January 3, 2012

ब्रेकिंग न्यूज- महापालिकांचे १६ फेब्रुवारीला मतदान ! जिल्हा परिषदांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ! महापालिकांची मतमोजणी १७ फेब्रुवारीला ! जि. प.ची मतमोजणी ८ फेब्रुवारीला

राज्यातील १० महापालिका निवडणुका येत्या १६ फेब्रुवारी तर २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी दिली.


आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मिनी विधानसभा अशी या निवडणुका असे या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती या ठिकाणी येत्या १६ फेब्रवारी रोजी मतदान होणार असून यातील काही महापालिकांची मतदान मोजणी १६ तारखांनाच होणार असून इतर महापालिकाची मतमोजणी १७ तारखेला होणार आहे.संबंधीत महापालिकांच्या आयुक्तांनी व्यवस्था केल्यावर मतमोजणी १६ तारखेला होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. या पूर्वी नंदुरबार नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी

महापालिका निवडणूक आधी घेऊन थोड्या अंतराने जिल्हा परिषद निवडणूक व्हावी, असे सरकारला वाटत होते. महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास या दोन्ही निवडणुकांच्या प्रचाराशी संबंध येणाऱ्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागेल ही भीती सरकारला वाटत असल्याने ही विनंती करण्यात आली आहे. तर अगोदर जिल्हा परिषद निवडणूक घेऊन नंतर महापालिका निवडणूक अथवा दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आयोगाचा आग्रह होता. महापालिका क्षेत्रातील मतदारांना खूष करणारे निर्णय झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील मतदारांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. अन्यथा नगरपालिका निवडणुकीप्रमाणे फटका बसेल, अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि निवडणुका या एकाच कालावधीत येत असल्याने दर पाच वर्षांनी या संदर्भात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे परीक्षांपूर्वी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत निवडणुका संपवता येतील का हे पाहावे लागेल, अर्थात या बाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगच घेईल , असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले होते.

दहावी-बारावी परीक्षा आणि निवडणुका या दर पाच वर्षांनंतर एकत्र येतात. मागील वेळी परीक्षांच्या आधी महापालिका तर नंतर जिल्हा परिषदा निवडणुका झाल्या होत्या. आत्ताही परीक्षा पुढे ढकलण्यास शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला होता.

(From Zee 24 Taas)