आज ही माझ्याच पासुन दूर मी ही
तू जशी आहे तसा मजबूर मी ही
भेटण्या जितकी मला उत्सुक असते
ये व्यथे ये तेवढा आतूर मी ही
जेवढे जातो जवळ ती लांब जाते
वाटते आता रहावे दूर मी ही
लागला होता तिला माझा लळा पण,
प्रेम ही केले तसे भरपूर मी ही
येवढे शिकलो यशश्वी डाव त्यांचे,
जाहलो बघ खेळतांना क्रूर मी ही
सांगणारे सांगता लाखो कहाण्या
नीट आता वाचतो मचकूर मी ही
-
दर्शन शहा (स्नेहदर्शन)
No comments:
Post a Comment