यांच्या नशिबी दुष्काळच
ओला काय ? अन सुका काय ?
हतबलता ना काही दिलासा
नाय...!
तहानलेल्या आईची चिंता
खळगी भरणाऱ्या बापाची चिंता
भेगाळलेला भूईला कस भिजवू ?
फुटलेल्या डोळ्यात पाणीच
नाय...!
आश्वासनांची खैरातीला....
मुडद्याची रांग....!!
सावकारी कर्जांची दमझाक
आत्महत्या बाकी गाठोडे...!!
घरदारावर मात्र सार्यांचे
पाय...!!
हेच रहाटगाड ग सारीकडे
नांगरलेले आयुष्य सारीकडे
निसर्गच कोपला....!!
तेहतीस कोटी देवांचे काय ??
हतबलता
बारमाही काहीशी अंधुक आशा
फक्त ...!!
- देविदास खडताळे, नाशिक
No comments:
Post a Comment