Tuesday, November 5, 2013

दिवाळी कां ?



दिवाळी आली की आपण आवर्जून उत्साहाने रांगोळी, दिवे आणि फराळाचे करतोच.
आपली दिवाळी गाई गोऱ्ह्याच्या बारसपासून सुरु होते. नरक चतुर्दशी आणि दिवाळी ची अमावस्या त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज. नरक चतुर्दशी ला भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला, आसुरी शक्ती म्हणजे शक्ती चा अयोग्य ठिकाणी वापर . शक्ती चा सदुपयोग म्हणजे देवाचा विजय.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळोखात अनेक आकाशदिवे उजळत असतात आणि अंधाराचा नाश हे सुचवत असतात. लक्ष्मीपूजनाची रात्र महारात्र अशी संबोधली जाते . होळीची रात्र देखील महारात्र आहे. पण या दोन्ही रात्रीना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नेमके विरुद्ध दिशांना असल्याचे सिध्द झाले आहे. बळी-राजाचा पराभव करून बटू वामनाने म्हणजे विष्णूनी महालक्ष्मीची सुटका केली आणि बळी दैत्यांचा राजा ह्यास पाताळात घातले म्हणजे पृथ्वीपासून दूर नेले यामुळे  पृथ्वी दाबली गेली तिचे गुरुत्वाकर्षण वाढले. 

हा आनंदोत्सव दिवे लावून  साजरा करण्याची पद्धत पडली. दिवाळीच्या पाडव्याला गोवर्धनाची पूजा करतात. गोवर्धन पर्वत शेणाचा किंवा अन्नकुट असा बनवतात.
कृष्णाच्या कथांमध्ये पर्यावरण जपण्याचा कितीतरी मोठा हेतू स्पष्ट होतो. गोवर्धनाची पूजा म्हणजे डोंगराची पूजा. मान्सूनचे वारे भारतात जून च्या सुरवातीस वाहू लागले कि पश्चिमघाटातील सह्याद्रीच्या डोंगरांमुळे अडवले जातात आणि मग पाउस पडतो. आपला पश्चिम घाट आता जागतिक वारसा झाला आहे. भगवान श्रीकृष्णांनी नेमके हेच ओळखून गोवर्धनाची पूजा केली असावी.

आपले पूर्वज आणि पद्धती सगळ्याच काही टाकाऊ नाहीत. गरज आहे त्या कां घालून ठेवल्यात , त्या पद्धती कां पडल्या ह्याचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याची.
मग ह्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ती जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा.
                                             
                                                            - डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक

शब्दसाथी २०१३



यंदा ऑनलाईन दिवाळी 

वाचकांना केंद्रित धरुन दिवाळी अंकाची मांडणी होते. दिवाळीसाठी वर्षभर मेहनत घेणारे वृत्तपत्रे, नियतकालिके आपण आज पाहत आहोत. याचीच परंपरा साथीदार चालवीत आहे. यावर्षीही तशीच मेहनत घेत असतांना अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही तो आपल्या सर्वांच्या छापील स्वरूपात तो देऊ शकलो नाही त्याबद्दल दिलीगीर आहोतच. कारण तब्बल २३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. असो पण डिजिटल युगात ब्लॉग च्या सहाय्याने आम्ही साथीदार चा शब्दसाथी २०१३ आपल्यासमोर सादर करीत आहोत.

यात समाविष्ट लेखकांची नांवे पुढीलप्रमाणे-   

  • डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक
  • भाग्यश्री कुलकर्णी
  • कु. स्वाती बंगाळे, पंढरपूर
  • दर्शन शाह, धुळे
  • देविदास खडताळे, नाशिक
  • चित्रा राजगुरू-बोराडे
  • राजश्री नानकर
  • विकास भुजबळ, लासलगाव

Sunday, November 3, 2013

शब्दसाथी २०१३



नमस्कार वाचकांनो काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे या वर्षाचा दिवाळी विशेषांक आम्ही पुस्तक स्वरुपात आम्ही प्रकाशित करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 
-                                                                                                                                                                                                                           - व्यवस्थापक
 

परंतु आपल्यासाठी खास ऑनलाईन स्वरूपात काही निवडक लेख साथीदार च्या ब्लॉगवर देत आहोत.
तरी आपण या लेखांचा आनंद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवाव्यात.  


दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी शांती आणि समाधान 

प्रदान करो हीच सदिच्छा.......!!



 
शुभेच्छुक - समस्त साथीदार आणि पालीवाल परिवार