Tuesday, January 21, 2014

साप्ताहिक साथीदार युवक दिन विशेषांक



साप्ताहिक साथीदार युवक दिन विशेषांक
साथीदार कडून स्वामी विवेकानंदाच्या १५१ व्या जयंतीस आणि युवक दिनानिमित्त मेलद्वारे युवकांच्या अपेक्षा आणि उपेक्षा यांवर मत मागविले गेले. त्यातील काही निवडक मते खास आपल्या वाचकांसाठी- 

विराम गांगुर्डे, नाशिक - 

ग्रामीण भागातील युवांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. त्याने या देशाची प्रगती होईल. संस्कृती न विसरता तिचे जतन आणि संवर्धन करावे. आपण कोण आहोत आणि काय करत आहोत याचेही भान युवापिढीने ठेवायला पाहिजे.

चित्रा राजगुरू, नाशिक - 

युवा हा वयवाचक शब्द नसून तो वृत्तीवाचक शब्द आहे. सगळ्याच पारंपारिक गोष्टी व पद्धती कुलाच्या आहे असे नाही, पण प्रगतीत बाधा आणणाऱ्या व नवीन कल्पनांना नाकारणाऱ्या विचारांना मोडून नवनवीन कल्पनांचा पुरस्कार करणारा प्रत्येक विचार व त्याला स्वीकारणारा प्रत्येक व्यक्ती युवा आहे.

अमृता घोलप, नाशिक

आजच्या युवा पिठीला भरपूर स्वातंत्र्य मिळाले आहे. प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा मिळाली आहे, त्यामुळे त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये एवढेच आजच्या युवापिढीने लक्षात ठेवले पाहिजे.

अजिंक्य तरटे, नाशिक


सध्या स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार प्रत्यक्षात येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील १०० तरुण बनण्याचा प्रयत्न सध्याच्या काळातील तरुणांनी करायला हवा. आजही त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. सोशल साईटला आहारी गेलेल्या तरुणांनी त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

प्रसाद पाटील, पुणे
प्रथम माझ्या सर्व युवक मित्रांना युवक दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा..माझा एकच संदेश युवक दिनानिमित्त आहे की व्यसनाधीन होवु नका व आपल्या देशाला जागतिक महासत्ता देश बनविण्यासाठी आधुनिकीकरणाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेवुया. जरी आजचे युवक कोठेतरी भरकटले असले तरी मी स्वता सध्याच्या युवकांकडुन आशावादी आहे, ते नक्कीच कदाचित इतिहास घडवतिल...





(काही तांत्रिक कारणामुळे हा अंक उशिरा टाकत आहोत. तरी कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी - व्यवस्थापक)

No comments:

Post a Comment