Tuesday, November 5, 2013

शब्दसाथी २०१३



यंदा ऑनलाईन दिवाळी 

वाचकांना केंद्रित धरुन दिवाळी अंकाची मांडणी होते. दिवाळीसाठी वर्षभर मेहनत घेणारे वृत्तपत्रे, नियतकालिके आपण आज पाहत आहोत. याचीच परंपरा साथीदार चालवीत आहे. यावर्षीही तशीच मेहनत घेत असतांना अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही तो आपल्या सर्वांच्या छापील स्वरूपात तो देऊ शकलो नाही त्याबद्दल दिलीगीर आहोतच. कारण तब्बल २३ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. असो पण डिजिटल युगात ब्लॉग च्या सहाय्याने आम्ही साथीदार चा शब्दसाथी २०१३ आपल्यासमोर सादर करीत आहोत.

यात समाविष्ट लेखकांची नांवे पुढीलप्रमाणे-   

  • डॉ. संज्योती सुखात्मे, नाशिक
  • भाग्यश्री कुलकर्णी
  • कु. स्वाती बंगाळे, पंढरपूर
  • दर्शन शाह, धुळे
  • देविदास खडताळे, नाशिक
  • चित्रा राजगुरू-बोराडे
  • राजश्री नानकर
  • विकास भुजबळ, लासलगाव

Sunday, November 3, 2013

शब्दसाथी २०१३



नमस्कार वाचकांनो काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे या वर्षाचा दिवाळी विशेषांक आम्ही पुस्तक स्वरुपात आम्ही प्रकाशित करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 
-                                                                                                                                                                                                                           - व्यवस्थापक
 

परंतु आपल्यासाठी खास ऑनलाईन स्वरूपात काही निवडक लेख साथीदार च्या ब्लॉगवर देत आहोत.
तरी आपण या लेखांचा आनंद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवाव्यात.  


दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी शांती आणि समाधान 

प्रदान करो हीच सदिच्छा.......!!



 
शुभेच्छुक - समस्त साथीदार आणि पालीवाल परिवार

सर्वांना शुभ दीपावली




ही दिवाळी त्यांची ज्यांनी हातांनी हे दिवे घडविले,

ज्यांनी हे जागून कंदील बनविले,

ज्यांनी आपण दिवाळी शांततेने साजरी करावी म्हणून जबाबदारी घेतली आहे.

त्यांना सर्वांना आणि त्यांच्या परिवारालाही दिवाळीच्या शुभेच्छा !!






Sunday, October 20, 2013

एक नवीन सदर आपल्या साथीदार च्या ब्लॉगवर

काहीतरी पहिले किंवा वाचले कि सुचते आणि ते आपण शब्दांत आणतो. याला साथ म्हणून तुमचे विचारशब्द आम्ही प्रत्यक्षातआणू ते देखील साप्ताहिक साथीदार च्या ब्लॉगवर. 

याचाच हा पहिला प्रयत्न, आम्हाला आपल्या भावना आणि प्रतिसाद नक्की कळवा.
- साथीदार
 
 "रुबेला" ची कहाणी
होणार सून मी ह्या घरची  हे सिरीयल सध्या झी मराठी वर गाजते आहे .जान्हव्ही आणि श्री यांचे दृढ प्रेम तर आजी ची येणाऱ्या सुने बद्दल काळजी आणि जान्ह्व्ही च्या बाबांना झालेला आनंद ,य बरोबर आजकाल च्या मुलीनी आवर्जून आवश्यक  आहे ते विवाह पूर्व समुपदेशन आणि तेही अनुभवी तज्ञ स्त्री रोग तज्ञा कडून .

लग्नानंतर येणाऱ्या अनेक जबाबदार्या मध्ये मातृत्वाची सुखद सुरवात करण्या पूर्वी रुबेला ची लस कमीत कमी सहा महिने लग्नाआधी टोचून घेणे इष्ट आहे .लग्नानंतर घेतली तर किमान तीन महिने दिवस न जाउ देण्याची काळजी घ्यावी लागते . अन्यथा गर्भावर परिणाम हौऊ शकतो .निरोगी आणि व्यंग नसलेले बा ळ जन्माला यावे असे वाटत असेल तर वरील लस घेणे आवश्यकच आहे.

गर्भधारणेनंतर प्रथम तीन महिन्यात आणि त्यानंतर देखील  बाळामध्ये रुबेला मुळे दोष निर्माण होतात .
रुबेला लस घेउन हे टाळता येते. रुबेला चे आई च्या रक्तातील विषाणू सुप्तावस्थेत  गर्भावर गंभीर परिणाम करतात . हे लक्षात घेणे गरजेचे आहे आजकाल मुलीना घर आणि करिअर सांभाळताना गर्भपात टाळण्यासाठी रुबेला संबंधी विशेष जनजागृती होणे गरजेचे वाटते .

ह्या सर्व गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती तुमच्या स्त्री रोग तज्ञाशी संवाद साधण्याची, दिवाळीचा आनंद लुटताना आपण ह्या लसी बद्दल देखील माहिती आपल्या मैत्रिणी, आई, काकू, मामी, आजी यांच्यासोबत जरूर शेअर करा .

- डॉ. संज्योती सुखात्मे,
नाशिक.

Tuesday, October 8, 2013

भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!


आपल्या शहराचे लाडके आ. जगदीशचंद्र वळवी यांना 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!





 -----------------------------------------------------------------------------------------------------------
साप्ताहिक साथीदार परिवाराकडून आ. जगदीशचंद्र वळवी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!
शुभेच्छुक :-

अनिलकुमार पालीवाल

सौ. किरण अनिल पालीवाल