Sunday, October 20, 2013

एक नवीन सदर आपल्या साथीदार च्या ब्लॉगवर

काहीतरी पहिले किंवा वाचले कि सुचते आणि ते आपण शब्दांत आणतो. याला साथ म्हणून तुमचे विचारशब्द आम्ही प्रत्यक्षातआणू ते देखील साप्ताहिक साथीदार च्या ब्लॉगवर. 

याचाच हा पहिला प्रयत्न, आम्हाला आपल्या भावना आणि प्रतिसाद नक्की कळवा.
- साथीदार
 
 "रुबेला" ची कहाणी
होणार सून मी ह्या घरची  हे सिरीयल सध्या झी मराठी वर गाजते आहे .जान्हव्ही आणि श्री यांचे दृढ प्रेम तर आजी ची येणाऱ्या सुने बद्दल काळजी आणि जान्ह्व्ही च्या बाबांना झालेला आनंद ,य बरोबर आजकाल च्या मुलीनी आवर्जून आवश्यक  आहे ते विवाह पूर्व समुपदेशन आणि तेही अनुभवी तज्ञ स्त्री रोग तज्ञा कडून .

लग्नानंतर येणाऱ्या अनेक जबाबदार्या मध्ये मातृत्वाची सुखद सुरवात करण्या पूर्वी रुबेला ची लस कमीत कमी सहा महिने लग्नाआधी टोचून घेणे इष्ट आहे .लग्नानंतर घेतली तर किमान तीन महिने दिवस न जाउ देण्याची काळजी घ्यावी लागते . अन्यथा गर्भावर परिणाम हौऊ शकतो .निरोगी आणि व्यंग नसलेले बा ळ जन्माला यावे असे वाटत असेल तर वरील लस घेणे आवश्यकच आहे.

गर्भधारणेनंतर प्रथम तीन महिन्यात आणि त्यानंतर देखील  बाळामध्ये रुबेला मुळे दोष निर्माण होतात .
रुबेला लस घेउन हे टाळता येते. रुबेला चे आई च्या रक्तातील विषाणू सुप्तावस्थेत  गर्भावर गंभीर परिणाम करतात . हे लक्षात घेणे गरजेचे आहे आजकाल मुलीना घर आणि करिअर सांभाळताना गर्भपात टाळण्यासाठी रुबेला संबंधी विशेष जनजागृती होणे गरजेचे वाटते .

ह्या सर्व गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती तुमच्या स्त्री रोग तज्ञाशी संवाद साधण्याची, दिवाळीचा आनंद लुटताना आपण ह्या लसी बद्दल देखील माहिती आपल्या मैत्रिणी, आई, काकू, मामी, आजी यांच्यासोबत जरूर शेअर करा .

- डॉ. संज्योती सुखात्मे,
नाशिक.

No comments:

Post a Comment