Friday, June 15, 2012

आ. अरुणभाई गुजराथी आणि श्री.विठ्ठलकाका गुजराथी वाढदिवस विशेषांक

आ. अरुणभाई गुजराथी आणि श्री.विठ्ठलकाका गुजराथी वाढदिवस विशेषांक
साप्ताहिक साथीदार परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ............!!!!




  शुभेच्छुक

प्रा. जैमिनी कडू
अनिलकुमार पालीवाल
अमृतराज सचदेव
सौ. किरण अनिलकुमार पालीवाल
साथीदार परिवार 

Friday, February 17, 2012

आता पर्यंतच्या जागांचा निकाल खास आपल्यासाठी :-

आता पर्यंतच्या जागांचा निकाल खास आपल्यासाठी :-

चोपडा Election Of जिल्हा परिषद :-

NCP :- 3

Congress :- 1

Sena :- 2

BJP :- 0


पंचायत समिती :-


NCP :- 7

Congress :- 1

Sena :- 2

BJP :- 1

Apaksh :- 1

- Sathidar Buereu.

Saturday, January 7, 2012

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -IV

मत्स्योत्पादन :

महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, रेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.


४) भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन


० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.

५) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्‍‌र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लोही, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अ‍ॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.


(Source :- Loksatta Career Counselor)

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -III

कृषीविषयक घटक

० भारतातील ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ ही संस्था जमिनीची मोजणी करून आकडेवारी प्रसिद्ध करीत असते. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण ९२.७ टक्के जमिनीचे मापन करणे शक्य झाले आहे.
० भारतातील एकूण जमिनीचे आकारमान ३२.८७ कोटी हेक्टर आहे. यापैकी ३०.४४ कोटी हेक्टर जमिनीचे मापन करण्यात आले आहे.
० भारतातील उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. प्रत्यक्ष लागवडीखालील असलेल्या जमिनीपैकी २० टक्के जमिनीवर दुबार पिके घेतली जातात.
० लागवडीखालील निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. तर दुबार पिके घेण्याबाबत महाराष्ट्राचा भारतात १८ वा क्रमांक लागतो.
० महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१ टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. राज्यातील वनक्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्र विदर्भात, पाच टक्के मराठवाडय़ात व ३९ टक्के क्षेत्र उर्वरित महाराष्ट्रात आहे.
० भारतीय संविधानाच्या कलम ५१ (९) (जी) प्रमाणे वने, नद्या, जलाशय व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
० २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ५२ टक्के जनता स्वयंपाकासाठी जळावू लाकडावर अवलंबून आहे.
० भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५४ टक्के हे पिकाखाली क्षेत्र, आठ टक्के क्षेत्र दोन ते तीन वर्षांनी लागवडीखाली, १३ टक्के जमीन पडीक तर २२ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे. एकूण लागवडीच्या ७६ टक्के क्षेत्र निव्वळ अन्नधान्य उत्पादनासाठी वापरले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पदनाच्या २६.५ टक्के उत्पादन कृषी साधनापासून मिळते म्हणून भारत कृषीप्रधान देश आहे.
० भारत देश हा १९७४ साली अन्नधान्य उत्पादनात स्पयंपूर्ण झाला तर १९७७ मध्ये प्रथम अन्नधान्य निर्यात केले.
० तांदूळ हे देशातील महत्त्वाचे पीक मानले जाते. तांदूळ उत्पादक देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी २१.६ टक्के उत्पादन भारतात होते. भारतात तांदळाचे पंजाब, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू ही तीनच राज्ये उच्च उत्पादकता असलेली राज्ये ओळखली जातात.
० तांदळाच्या नवीन सुधारित प्रचलित जाती- अभिषेक, भूतनाथ, चंद्रमा, इंदिरा सोना, सम्राट.
० चुरमुरे, पोहे तयार करण्यासाठी तांदळाची जात- राधानगरी १८५-२
० ‘सुवर्णा सबमर्जन्स-१’ ही तांदळाची नवी जात पूरप्रतिबंधक असून मोठय़ा पुरातही टिकून राहणारी आहे. (फिलिपाईन्समधील मनिला येथील संशोधकांनी शोधून काढली.)
० महाराष्ट्र देशात साखर उद्योगात आघाडीवर असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३६ ते ४० टक्के साखर उत्पादन होते. महाराष्ट्रात एकूण १९३ साखर कारखाने आहेत.

२) फलोत्पादन : नारळ हे उष्ण कटिबंधीय पीक आहे. नारळाच्या जागतिक उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक इंडोनेशिया, दुसरा क्रमांक फिलिपाइन्स व तिसरा- भारत.
० महाराष्ट्रात ३२,००० हेक्टर (२००९) क्षेत्र नारळाखाली आहे.
० भारताची सरासरी प्रतिहेक्टर नारळ उत्पादन क्षमता ६६३२ आहे.
० नारळाच्या जाती- ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, यलो डॉर्फ, बाणवली (उंच जात)
० २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
० चिंच- महत्त्वाची जात- प्रतिष्ठान (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
० आंब्याच्या महत्त्वाच्या जाती- हापूस, रत्ना, मल्लीका, आम्रपाली, सिंधू इ.
० केळीच्या जाती- बसराई, हरिसाल, सालवेलची, सफेद वेलची, राजेडी इ.
० मोसंबीच्या प्रचलित जाती- न्यूसेलर, मालगुडी, जाफा, वॉशिंग्टन नॉवेल, सातगुडी इ.
० डाळिंबाच्या जाती- गणेश (डीबीजी-१), मस्कत, डोलका, काबूल, आळंदी इ.
० चिक्कूच्या महत्त्वाच्या जाती- क्रिकेट बॉल, कोईमतूर-१, पिल्ली पत्ती, बंगलोर इ.
० द्राक्ष- माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन सिडलेस, शरद सिडलेस, किसमिस बेरी इ.
० नाशिक जिल्ह्य़ात पिंपळगाव बसवंत व पुणे जिल्ह्य़ात नारायणगाव येथे श्ॉम्पेन तयार करतात.
० पेरू- सरदार, धारवाड, बनारसी, कोथरूड, लखनऊ २९, नाशिक इ.
० अंजिर- पूना अंजीर, काबूल, लखनौ, मार्सिलीस, ब्राऊन
तुर्की इ.
० महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात अहमदनगर जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक लागतो.
० अननसाचे उगमस्थान- ब्राझील
० काजूचे उगमस्थान- ब्राझील.
० मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात- पांढुर्णा.
० संपूर्ण भारतात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश (६० टक्के) मध्ये होते.
० चिक्कू झाडाचे मूळस्थान- मेक्सिको
० आंब्याचे मूळस्थान- वायव्य आशिया
० डाळिंबाचे मूळस्थान- इराण
० अंजीराचे मूळस्थान- दक्षिण अरेबिया
० काजूचे मूळस्थान- ब्राझील
० फळांचे अभ्यास करणारे शास्त्र- पोमोलॉजी

(Source - Loksatta Career Counselor)

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा Notes Part -II

क्रीडाविषयक

० २०१० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोची केरळ येथे पार पडणार आहे.
० २०१० मध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत (नवी दिल्ली)
० जागतिक युवा व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. विजेता संघ : ब्राझील, उपविजेता : क्युबा
० २००९ फ्रेंच ओपन टेनिस : रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवा
० आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष : लिअ‍ॅद्रो नेग्री
० आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष : जोसेफ ब्लॅटेर
० रोम येथे पार पडलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत चीनच्या झाओजिंगने विश्वविक्रम केला.
० संदीप शेजवळ व वीरधवल खाडे भारताचे जलतरणपटू आहेत.
० सोमदेव देववर्मन हा खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० सुदीरमन करंडक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
० नेहरू करंडक फुटबॉल खेळाशी संबंधित आहे.
० अझलन शहा कप हॉकी खेळाशी संबंधित आहे.
० सानामाचा चानू व प्रतिमा कुमारी वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित आहे.
० सायकलिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीत स्पेनचा अल्बर्ट कोन्टाडोर याने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.
० शरथ कमल टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० चवथ्या जागतिक मिलिटरी स्पर्धा (२००७) हैदराबाद येथे पार पडल्या.
० देवधर चषक, दुलिप करंडक, इराणी चषक, रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
० ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदक पटकावले.

संरक्षणविषयक

० भारतीय नौसेनेची संपूर्ण विश्वभर भ्रमण करणारी बोट : आयएनएस तरंगिनी.
० भारताच्या ‘अग्नी १’ या समकक्ष पाकिस्तानचे क्षेपणास्त्र : घौरी
० भारताचे पहिले वैमानिकरहित विमान : लक्ष्य
० जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र : पृथ्वी, अग्नी, नाग
० जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र : आकाश, त्रिशूल, ब्राह्मोस
० ध्वनीच्या तिप्पट वेगाने २९० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणारे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपमे विकसित केलेले ‘ब्राह्मोस’ हे सुपरसोनिक जहाजभेदी क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
० अमेरिकन बनावटीची वैमानिक विरहित विमाने : चकोर
० सूर्य हे ५००० कि.मी. पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.
० भारतीय हवाई दलात महिला वैमानिकांचा समावेश : १७ डिसेंबर, १९९४ पासून.

अर्थ व वाणिज्यविषयक

० भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार अमेरिका देशाशी आहे.
० भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा देश : मॉरिशस, दुसरा-अमेरिका, तिसरा-जपान
० जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था : चीन, दुसरा-भारत.
* भारतात दारिद्रय़ रेषेखालील लोकांचे सर्वाधिक प्रमाण : ओरिसा (४६.४०टक्के)
० भारतात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य : महाराष्ट्र
० मंदी आणि आर्थिक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करण्याचा भारताचा जगात ऑस्ट्रेलिया, चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.

शैक्षणिकविषयक व आरोग्यविषयक

० भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा : मल्लापुरम (केरळ)
० भारतीय संशोधकांनी म्हशीचे जगातील दुसरे क्लोन तयार केले असून ‘गरिमा’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पहिले क्लोन ‘गौरी’ याच संशोधकांनी निर्माण केले होते.
० स्वाईन फ्ल्यू हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या H1N1 या विषाणूमुळे होतो. मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण २१ एप्रिल, २००९ रोजी आढळला. H1N1 हा विषाणू इवसन संस्थेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो.
० मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
इतर प्रश्न
० भारताची १०१ वी घटना दुरुस्ती जीवनावश्यक वस्तूंबाबत असून १०३वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याबाबत आहे.
० राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना : २३ फेब्रुवारी, २००७.
० भारत-पाक रेल्वे सेवा : समझोता एक्स्प्रेस
० भारत-पाक बस सेवा : साद-ए-सरहद, कारवाँ-ए-अमन
० भारत-बांग्लादेश रेल्वे सेवा : मैत्री एक्स्प्रेस
० विविध आयोग व समिती:
० बाबरी मशीद प्रकरण : लिबरहान आयोग
० गोध्रा हत्याकांड : नानावटी आयोग
० निवडणूक सुधारणाविषयक समिती : व्ही. एम. तारकुंडे समिती
० मतदारसंघ पुनर्रचना आयोग : न्या. कुलदीप सिंह
० महत्त्वाची योजना:
० मांगल्यसूत्र योजना : ही योजना अल्पदराची योजना असून केरळ राज्यामध्ये मुलीच्या लग्नामुळे तिच्या वडिलांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारने राबविलेली योजना.