Thursday, November 10, 2011

ई बातमी



अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी जात दावा पडताळणीसाठी मतदान दिनांकाच्यापूर्वी ४५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ या कालावधीत राज्यातील प्रस्तावित असलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांच्या जातीचा दावा पडताळणीसाठी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे संबंधित निवडणुकीच्या मतदानाच्या निवडणुकीपूर्वी किमान ४५ दिवस अगोदर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावीत.

राज्य शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभागांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याबाबत नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे प्रभागाच्या आरक्षणामध्ये बदल यामुळे प्रभाग आरक्षण निश्चिती करणामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील फेरफारामुळे इच्छुक उमेदवारांना राखीव प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी जातीचा दावा पडताळणीसाठी काही कालावधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या विविध स्तरावरील विनंतीचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही व्यवस्था केवळ वरील कालावधीतील होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी विशेष बाब म्हणून करण्यात येत आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०११११०११४४४५३००१ असा आहे.

No comments:

Post a Comment