Thursday, September 29, 2011

चोपडय़ात वहनोत्सवास सुरुवात

चोपडा

तालुक्यातील वहनोत्सव व रथोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. ८ ऑक्टोबर रोजी रथयात्राही पार पडणार आहे. श्रीव्यंकटेश बालाजी संस्थानच्या या उत्सवाला सुमारे ३६० वर्षांची परंपरा आहे. या उत्सवांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानचे विठ्ठलदास गुजराथी यांनी केले आहे.

६ ऑक्टोबपर्यंत शहराच्या विविध भागांत श्रीबालाजीच्या मूर्तीरूढ वहनाची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानुसार बुधवारी मोठा देव्हारा येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी अरुणनगर व श्रीरामनगर येथून गरुड, शुक्रवारी गुजरअळी येथून सिंह, १ ऑक्टोबर रोजी सुंदर गढीपासून नागोबा, २ ऑक्टोबर रोजी सूर्यावर, ३ ऑक्टोबर रोजी बडगुजरअळी, ४ ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई चौकातून मोर, ५ ऑक्टोबर रोजी गुजराथी गल्लीतून वाघ आणि ६ ऑक्टोबर रोजी घोडय़ावरून मिरवणूक काढण्यात येईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीबालाजी मंदिरापासून रथाला सुरुवात होईल. शिवाजी चौकात भाविकांच्या दर्शनासाठी रथ ठेवण्यात येईल.

८ ऑक्टोबरपासून रथाचा परतीचा प्रवास मेनरोड, बाजारपेठ, गोल मंदिरापर्यंत होईल. बालाजी प्रतिष्ठानच्या या वहनोत्सवाला दररोज रात्री ९ वाजता सुरुवात होते. दरम्यान, नवरात्र उत्सवानिमित्ताने ग्रामदैवत असलेल्या श्रीआनंदी भवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment