चोपडा - पालिकेने आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध होत असला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदार, नगरसेवक यांनी हा बहिष्कार टाकला असला तरी राष्ट्रवादीचे पालकमंत्री गुलाब देवकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. आघाडीतील काही नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारीदेखील जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गैरहजर होते. बहिष्काराच्या ग्रहणात कार्यक्रम मात्र थाटात पार पडला.
या सोहळय़ात पालिकेने उभारलेले प्रशासकीय भवन, घरकुल योजना, शिवाजी चौकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तीन रस्ते, घरकुल योजना टप्पा क्रमांक-२ या विकासकामांचे भूमिपूजन आदी सोहळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा राज्यमंत्री पद्माकर वळवी, आ. सुरेश जैन, माजी आमदार गुलाबराव पाटील, अॅड. जयप्रकाश बाविस्कर, डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शहर विकास आघाडीचे नेते माजी आमदार कैलास पाटील, अॅड. संदीप पाटील, अनिल वानखेडे, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप आदी पक्षांचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पद्माकर वळवी यांनी चोपडा पालिकेच्या क्रीडा संकुलासाठी एक कोटींचा निधी १५ दिवसांत देणार असल्याची आणि पालिका कामगार व त्यांच्या पाल्यांकरिता कामगार भवन उभारणार असल्याची घोषणा केली. महसूलमंत्री थोरात यांनी विविध पक्षांनी उभारलेल्या आघाडीने चोपडय़ात विकास साधल्याचे सांगितले. पाचही वर्षे महिला नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. या बाबी कौतुकास्पद आहेत. तथापि विरोधक म्हणून आ. अरुणभाई गुजराती यांनी पालिकेच्या विकासकामांना कधीही विरोध केला नाही. आ. गुजराती यांच्या सहकार्याचा उल्लेख शिवसेनेचे माजी आ. गुलाबराव पाटील यांनीदेखील केला. धरणगाव तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करण्याची मागणी पाटील यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. आ. जैन यांनी आपण भ्रष्टाचारमुक्त निवडणूक लढविण्याचे आव्हान स्वीकारल्याचा पुनरुच्चार केला.
चोपडय़ाच्या विकासासाठी शहर विकास आघाडीने चांगले प्रयत्न केल्याने पुन्हा आघाडीला सत्ता मिळावी, झोपडीमुक्त चोपडा शहर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात आ. शिरीष चौधरी, माजी आ. अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांचीही भाषणे झाली.
Thursday, September 29, 2011
चोपडय़ात वहनोत्सवास सुरुवात
चोपडा
तालुक्यातील वहनोत्सव व रथोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. ८ ऑक्टोबर रोजी रथयात्राही पार पडणार आहे. श्रीव्यंकटेश बालाजी संस्थानच्या या उत्सवाला सुमारे ३६० वर्षांची परंपरा आहे. या उत्सवांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानचे विठ्ठलदास गुजराथी यांनी केले आहे.
६ ऑक्टोबपर्यंत शहराच्या विविध भागांत श्रीबालाजीच्या मूर्तीरूढ वहनाची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानुसार बुधवारी मोठा देव्हारा येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी अरुणनगर व श्रीरामनगर येथून गरुड, शुक्रवारी गुजरअळी येथून सिंह, १ ऑक्टोबर रोजी सुंदर गढीपासून नागोबा, २ ऑक्टोबर रोजी सूर्यावर, ३ ऑक्टोबर रोजी बडगुजरअळी, ४ ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई चौकातून मोर, ५ ऑक्टोबर रोजी गुजराथी गल्लीतून वाघ आणि ६ ऑक्टोबर रोजी घोडय़ावरून मिरवणूक काढण्यात येईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीबालाजी मंदिरापासून रथाला सुरुवात होईल. शिवाजी चौकात भाविकांच्या दर्शनासाठी रथ ठेवण्यात येईल.
८ ऑक्टोबरपासून रथाचा परतीचा प्रवास मेनरोड, बाजारपेठ, गोल मंदिरापर्यंत होईल. बालाजी प्रतिष्ठानच्या या वहनोत्सवाला दररोज रात्री ९ वाजता सुरुवात होते. दरम्यान, नवरात्र उत्सवानिमित्ताने ग्रामदैवत असलेल्या श्रीआनंदी भवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Labels:
chopda vahan,
latest chopda news,
rathoutsav,
sathidar chopda latest news,
sathidar vahan news
Sunday, September 4, 2011
Happy Teachers Day....To All Teachers...........
आमच्या २३ वर्षाच्या या समाधानकारक वाटचालीस आपला नेहमी पाठींबा राहिला आहे.
असाच पाठींबा पुढेही राहावा अशी आशा मनाशी ठेवतो.
आजतागयात आम्हाला वाटेच्या प्रत्येक वळणावर पाठराखण आणि ज्ञान देणारे आमचे हितचिंतक, गुरुवर्य तसेच आमच्या परिवाराशी ज्ञानार्जनासाठी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा ....!!
खालील ओळी त्या गुरुसाठी .........
" जो जागी शिकवी धन्य त्याचा जन्म आहे,
ज्ञान ज्योती तेवत ठेवा जिथे जिथे अज्ञान आहे."
- साथीदार परिवार
2:-
3:-
4:-
5:-
6:-
7:-

sathidar parivar,
sathidar teachers day,
sathidar teaxcher day,
teachers day sathidar,
techer day
Subscribe to:
Posts (Atom)