Sunday, December 22, 2013

पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करा - नरेंद्र मोदी

या सभेत मोदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाषण केले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :-
  • पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करा
  • वोट बँक चे राजकारण करणारी काँग्रेसला हद्दपार करा
  • केंद्र सरकार घोटाळ्यांची सरकार आहे
  • काँग्रेस मुक्त भारत करा
  • एकीकडे आम्ही लोह गोळा करून सरदार वल्लभभाई यांचा पुतळा उभारतो आहे तर दुसरीकडे ही महाराष्ट्र सरकार विक्रांत ची बोली लावत आहे
  • देशात सरकार त्यांचे असूनही महाराष्ट्राला २४ तास वीज पुरवठा का होत नाही ?
  • जलसिंचन प्रकल्प ताटकळत का पडले आहेत ?
  • विविध योजना ह्या केवळ नावापुरताच राहिल्या आहेत
  • मुंबईत बॉलीवूड असूनही त्यांच्यासाठी आणि देशातील इतर चित्रपटकर्मींसाठी तसेच ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यासाठी सिनेमाची १०० पुर्तीनिमित्त साधे फिल्म विद्यापीठ ह्यांनी केले नाही
  • एकाच दिवशी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळूनही महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विकासात तफावत आहे
  • महाराष्ट्र गुजरातचा मोठा भावासारखा आहे
  • मुंबई तर गुजराथी भाषेचे माहेरघर आहे
  • देशातील प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालाच पाहिजे
  • युवकांच्या कौशल्यावर भर दिला गेला पाहिजे
  • केंद्राने नर्मदा सरोवर चे दरवाजे बसविण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्राला ४०० करोड ची वीज मोफत मिळेन
  • केवळ स्वःताच्या फायदाचे पाहणारे काँग्रेस सरकार आहे
  • अल्पसंख्यांकांचे नाव वापरून केवळ योजना बनविल्यात, अंमलबजावणी किंवा खर्च मात्र शून्यच
  • एलबीटी हा लोकल बॉडी कर नसून तो “ लूट बाटनेकी टेकनिक ” आहे
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, लोडशेडीग यांकडे लक्ष वेधले
  • ही “महागर्जना” पूर्णपणे “मोदीमय” झाल्याची चित्र होते.

No comments:

Post a Comment