Sunday, August 1, 2010

साथीदार च्या तमाम वाचकांना मैत्री दिनाच्या शुभेछा....

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वाराची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अनिलकुमार द्वारकादास पालीवाल
मुख्य संपादक, सा. साथीदार

No comments:

Post a Comment