साप्ताहिक साथीदाराचा दिवाळी अंकाचे प्रकाशन चोपडा नगरीचे नगराध्यक्ष संदिपभैया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साथी दारचे मुख्य संपादक अनिलकुमार पालीवाल, महाराष्ट्र पालीवाल समाज अध्यक्ष कांतीलालजी पालीवाल, साथीदार संपादक अमृतराज सचदेव, चोपडा तालुका सेवाभावी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, लतीश जैन, हितेंद्र साळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अनिलकुमार पालीवाल यांनी रौप्यमहोत्सवाकडे साथीदारची वाटचाल थोडक्यात सांगितली. भैयासाहेबांनी साथीदार परिवाराचे खास कौतुक केले. गेल्या २२ वर्षापासून चोपड्यासारख्या छोट्याश्या तालुक्यातून एक साप्ताहिक टिकवणे आणि ते निरंतर चालू ठेवणे हे खरोखरच उल्लेखनीय बाब असल्याचेही त्यानी सांगितले.
यावेळचा दिवाळी अंक हा नेहमीप्रमाणे वाचनीय आणि संग्रही नक्की राहील हीच अपेक्षा बाळगतो.
- व्यवस्थापक